Jul 9, 2008

मी कुणाचा?

मी माझा, मी कोणाचा, मी हीचा!

मूळ कविता

अशी एक रात्र हवी
ज्याला पहाट जोडलेली नाही
अशक्यातली गोष्ट आहे पण
मी आशा सोडलेली नाहीविडंबन


अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवाने आशा सोडलेली नाही

तुला मी कधी
शपथ घ्यायला लावत नाही
कारण तुझ्यावरचा विश्वास
या इवल्या शब्दात मावत नाही.
तुला मी कधीही
वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास
या इवल्या मशीनवर मावत नाही.


झाडावरून प्राजक्त ओघळतो
तरी त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही.
बायकोने लाटणं फेकलं
तरी त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थ असा नाही
की नव-याला इजा होत नाही.


परवा मी पाहिली
ओंडक्याला पालवी फुटलेली,
मला मात्र कळले नाही
त्याला जगायची जिद्द कुठली
परवा मी पाहिली
ओठांवर लिपस्टिक उठलेली,
मला मात्र कळले नाही
थेरडीला नटायची हौस कुठली.


आता मी ठरवलंय
अगदी शहाण्यासारखं वागायचं
कुणाला काही दिलं तर
त्याच्या बदल्यात काही मागायचं.
आता मी ठरवलंय
स्टेफी ग्राफ सारखं वागायचं
फेकलेलं भांड झेलून
परतीला फेकायचं.


एकदा देहाबाहेर येवून मला
माझ्या देहाकडे बघायचंय,
अशक्यातली गोष्ट आहे पण मला
जरा देहाशिवाय जगायचंय.
एकदा हिच्या तावडीतून सुटून
मला बाहेर हात मारायचाय,
पण आता कळून चुकलंय
सात जन्म इथेच सडायचंय.


जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हटल्या तर
चांदण्याही फार नव्हत्या.
जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार नव्हत्या
हीच्या घोरण्याच्या सीमा
पार करायला तयार नव्हत्या.


सगळेच म्हणतात प्रेम करायला
लागत नाही अक्कल
पण सोपेही नाही कारण
सगळ्यांनाच जमत नाही नक्कल.
स्वानुभवी नवरा सांगतो
लग्न करताना गहाण पडते अक्कल
ही गोष्ट ऊमजायला लागते तोपर्यंत
डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टक्कल.


उंच उंच उडायला
मला एक आकाश दे
अंधार दूर करायला
मला थोडासा प्रकाश दे
दिवाळीची खरेदी करताना
मला कधीतरी ब्रेक दे
हमालीच्या पिशव्या वाहताना
श्वास घेण्याची तरी ऊसंत दे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...